येवला : वडीलांच्या स्मृती दिनानिमित्त प्राध्यापकाने सुरू केले वाचनालय

येवला : वडीलांच्या स्मृती दिनानिमित्त प्राध्यापकाने सुरू केले वाचनालय

येवला : तालुक्यातील धुळगाव येथील प्राध्यापक माधव गायकवाड यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त वाचनालय सुरु केले आहे. या समाजपयोगी उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

दरम्यान एन्झोकेम कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. माधव गायकवाड यांनी त्यांचे वडील पंढरीनाथ गायकवाड यांच्या स्मृती दिना निमित्त धुळगाव येथे पंचवीस हजार रूपये खर्चून स्वखर्चाने गावात वाचनालय सुरू केले. या वाचनालयात स्पर्धा परीक्षांंची पुस्तके असल्याने राज्य सेवा केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षा देणारे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

या वाचनालयाचे आज अॅड माणिकराव शिंदे, सहकार नेते अंबादास बनकर, श्री संभाजी पवार, नगररचना व मुल्य निर्धारण अधिकारी लातूरचे सागर मगर, विक्रीकर निरीक्षक त्रिवेदी गायकवाड नानासाहेब कुर्हाडे. व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गावातील जुन्या ग्रामपंचायत कार्यालयात वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थ्यांना मदत कराविशी वाटली गावातून अनेक तरूण पुढे जायला हवे, या उदात्त हेतुने हा उपक्रम सुरू केला आहे. तालुक्यातील मार्गदर्शक राजकिय व्यक्तींना हा उपक्रम आवडल्याने इमारत व आर्थिक मदत होणार आहे.
-प्रा. माधव गायकवाड

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com