नंदुरबार : १२ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त; नाशिक भरारी पथकाची कारवाई
स्थानिक बातम्या

नंदुरबार : १२ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त; नाशिक भरारी पथकाची कारवाई

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : नाशिक विभागीय भरारी पथकाने मलोनी, ता. शहादा जि नंदुरबार येथे अवैध मद्य निर्मिती करणाऱ्या गोडावून मध्ये छापा टाकत १२ लाख ६६ हजार ४५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्कचे उपायुक्त अर्जुन ओहोळ व अधीक्षक नंदुरबार युवराज राठोड यांच्या मार्गदशेनाखाली विभागीय भरारी पथक नाशिक कार्यलयाने केली. येथील गोडाऊनमध्ये मद्यनिर्मिसाठी लागणारे साहित्य आढळून आले. तसेच गावठी मद्याचा साठा सहित विदेशी मद्यही या ठिकाणी आढळून आले.

असा एकूण १२ लाख ६६ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर घटनास्थळी दोघांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com