अमेझॉनतर्फे लोकल शॉप्‍स ऑन अमेझॉन उपक्रम सादर; जाणून घ्या सविस्तर

अमेझॉनतर्फे लोकल शॉप्‍स ऑन अमेझॉन उपक्रम सादर; जाणून घ्या सविस्तर

नाशिक : अमेझॉन डॉट इनने आज ‘लोकल शॉप्‍स अमेझॉनच्‍या सादरीकरणाची घोषणा केली आहे. हा उपक्रम सर्व प्रकारच्‍या लोकल दुकानदार व किरकोळ विक्रेत्‍यांना ईकॉमर्सचे लाभ देणार असून देधभरातील पाच हजार पेक्षा अधिक दुकान दारांनी या उपक्रमाची नोंद केली आहे.

या उपक्रमातून लोकल शॉप्‍स ऑन अमेझॉन मध्‍ये सामील होणारे दुकानदार शहरांमध्ये जाऊन तात्काळ डिलिव्‍हरी देऊ शकतील. तसेच ही दुकाने अमेझॉनच्‍या इतर उपक्रमांचा देखील लाभ घेऊ शकतात, जसे डिलिव्‍हरी व पिकअप पॉइण्‍ट्ससाठी आय हॅव स्‍पेस आणि अतिरिक्‍त उत्‍पन्‍न कमावण्‍यासाठी त्‍यांच्‍या वॉक-इन ग्राहकांना विस्‍तारित रेंज देण्‍याकरिता अमेझॉन ईजी.

ऑनलाइन व ऑफलाइन खरेदीचा अनुभव सर्वोत्तम करण्‍याच्‍या उद्देशाने हा उपक्रम ग्राहकांना त्‍यांच्‍या घरामधूनच आरामशीरपणे त्‍यांच्‍या आवडीच्‍या लोकल दुकानांमधून खरेदी करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी आणि व्‍यापक रेंज, जलद डिलिव्‍हरी, तसेच डेमो व इन्‍स्‍टॉलेशन, जुन्‍या फोनमधून नवीन फोनमध्‍ये संपर्क क्रमांकाचे हस्‍तांतरण अशा इन-बिल्‍ट मूल्‍यवर्धित सेवांचा लाभ देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. पण सद्यस्थितीमुळे ग्राहक या उपक्रमांतर्गत लोकल दुकाने व किरकोळ विक्रेत्‍यांकडून फक्‍त आवश्‍यक वस्‍तूंची खरेदी करू शकतात.

गेल्‍या ६ महिन्‍यांपासून अमेझॉन ५००० हून अधिक दुकाने आणि ऑफलाइन किरकोळ विक्रेत्‍यांसह या उपक्रमासाठी एक पायलट चालवत आहे. हे किरकोळ विक्रेते अव्‍वल शहरे, तसेच प्रथम व द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमधील आहेत, जसे किचन, होम, फर्निचर, पोशाख, ऑटोमोटिव्‍ह, ब्‍युटी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, क्रीडा, किराणा माल, लॉन अॅण्‍ड गार्डन, पुस्‍तके, खेळणी, दागिने, मोठी उपकरणे इत्‍यादी.

अॅमेझॉन इंडियाच्‍या सेलर सर्विसेसचे उपाध्‍यक्ष गोपाळ पिल्‍लई म्‍हणाले, ”लोकल शॉप्‍स ऑन अॅमेझॉन हा उपक्रम भारत व जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्‍यासाठी देशातील कोणत्‍याही भागामधील प्रत्‍येक उत्‍साहित विक्रेत्‍याला सक्षम करण्‍यावरील आमच्‍या फोकसशी संलग्‍न आहे.

हा उपक्रम सर्व प्रकारची लोकल दुकाने व किरकोळ विक्रेत्‍यांना त्‍यांच्‍या विद्यमान संसाधने व मालमत्तांसह जोडत मोठ्या प्रमाणात ग्राहकवर्गाकडून लाभ घेण्‍यामध्‍ये सक्षम करतो. सोबतच ग्राहकांना एकीकृत मूल्‍यवर्धित सेवा व उत्‍पादनांच्‍या जलद डिलिव्‍हरीसह त्‍यांच्‍या शहरांमधील लोकल दुकानांमधून सोयीस्‍करपणे खरेदी करण्‍याची सुविधा मिळते.

हा उपक्रम लोकल दुकाने व किरकोळ विक्रेत्‍यांना तंत्रज्ञानाचा लाभ घेण्‍यामध्‍ये आणि त्‍यांना डिजिटल व हायब्रिड स्‍टोअर्समध्‍ये रूपांतरित करण्‍यामध्‍ये मदत करू शकतो.

अॅमेझॉन इंडिया हा उपक्रम वाढवण्‍यासाठी आणि भारतभरातील कोणत्‍याही प्रोत्‍साहित किरकोळ विक्रेता किंवा दुकानदाराला प्रशिक्षण देण्‍यासाठी १० कोटी रूपयांची गुंवतणूक करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com