वीज वाहिन्यांचा वीज पुरवठा पाच तासांनी पूर्ववत
स्थानिक बातम्या

वीज वाहिन्यांचा वीज पुरवठा पाच तासांनी पूर्ववत

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिकरोड : गेल्या पाच तासांपासून खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.

दरम्यान आज शहरात संध्याकाळी झालेल्या वादळी पावसामुळे नाशिक शहर विभाग १ अंतर्गत असलेल्या पाथर्डी येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रातील CT व PT ट्रान्सफॉर्मर जळाल्याने येथून निघणाऱ्या आठ विद्युत वाहिन्यांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास झाला आहे. यावेळी महावितरण च्या कर्मचाऱ्यांनी पुरवठा सुरळीत करण्याचे काम करीत तब्बल पाच तासांनी वीज पुरवठा पूर्ववत झाला.

सदर उपकेंद्रातील CT (Current Transformer) आणि PT (potacial transformer) या दोन्ही वर आकाशातील वीज कोसळून उपकेंद्रातील DC सप्लाय पूर्णपणे बंद पडला होता. यामुळे येथून निघणारे खालील ११ केवी व त्या अंतर्गत येणारा भाग इंदिरानगर, राजीवनगर, वासन नगर,नयनतारा, पार्क साईड, वडनेर, पाथर्डी आणि एकता या आठ ११ केव्ही वाहिन्यांचा वीज पुरवठा १८.३० पासून बंद झाला होता.

या वाहिन्यांवरील जवळपास ३० हजार ग्राहकांना वीज पुरवठा पासून वंचित रहावे लागत होते. यावेळी महावितरणचे अभियंते, अधिकारी व द्वारका उपविभागातील सर्व सहाय्यक अभियंता व जनमित्र यांच्या शर्तीच्या प्रयत्नाने रात्री अकराच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com