लॉकडाऊनमध्ये पोस्ट ठरले हजारोंचा ‘आधार’

लॉकडाऊनमध्ये पोस्ट ठरले हजारोंचा ‘आधार’

नाशिक : लॉकडाउनच्या काळात पोस्ट खाते अनेकांचा ‘ आधार ‘ ठरले आहे. पोस्टाने शेकडो नागरिकांच्या औषधांची ने-आण केली. लाखो रुपये ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरजू ग्रामस्थांच्या थेट हातात नेऊन दिले. शहरी भागातील पोस्टमन आणि ग्रामीण भागातील डाकसेवक नागरिकांपर्यंत पोचत होते अशी माहिती प्रवर अधीक्षक आर. ओ. तायडे यांनी दिली.

औषधांची ने-आण
लॉकडाउनच्या काळात पोस्ट खात्याचे सामान्य व्यवहार बंद होते. पण औषधांची आणि वैद्यकीय साहित्याची ने-आण सुरु होती. या सेवेसाठी स्पीड पोस्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात आलो होती. २४ मार्च ते ११ मे या कालावधीत या सुविधेचा फायदा ३३६९ नागरिकांनी घेतला. याशिवाय ५२४१ वैद्यकीय साहित्याची पार्सल्स विविध ठिकाणी पोचवली.

बचत खातेही सुरु पोस्टाच्या बचत खात्याचेही सामान्य व्यवहार सुरु होता. २३ मार्च ते १ मे या काळात पोस्टाच्या विविध प्रकारच्या बचत खात्यात २०० कोटींपेक्षा जास्त रक्कम झाली.

लोकांपर्यंत पोचवले साडेतीन कोटी
लॉकडाउनच्या या काळात पोस्टाची आधार एनेबल पेमेंट सिस्टिम उपलब्ध होती. या माध्यमातून गरजू नागरिकांच्या इतर बँकांच्या खात्यातही पैसे काढून पोस्टमन त्यांच्या घरी नेऊन देतो. या सुविधेच्या माध्यमातुन गरजू नागरिकांना साडेतीन कोटींपेक्षा जास्त रुपयांचे वाटप करण्यात आले. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची यामुळे सोय झाली. बाहेर सगळे लॉकडाऊन असतांनाही गरजू लोकांपर्यंत पैसे पोचवू शकलो.

लॉकडाउनच्या काळात सुरु असलेल्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी शहरी भागात ११३ पोस्टमन व ग्रामीण भागात ३८० डाकसेवक कर्तव्य बजावत होते. या काळातही पोस्ट नागरिकांचा आधार ठरले याचे आम्हाला सर्वाना समाधान वाटते अशी भावना तायडे यांनी व्यक्त केली.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com