PhotoGallery : गर्दी टाळण्यासाठी किराणा, मेडिकल समोर पोलिसांकडून मार्किंग
स्थानिक बातम्या

PhotoGallery : गर्दी टाळण्यासाठी किराणा, मेडिकल समोर पोलिसांकडून मार्किंग

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : कोरोनाचे पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, नाशिक मनपा यांनी दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी किराणा, मेडिकल, फ्लोवर मिल च्या ठिकाणी पोलिसांकडून मार्किंग करण्यात येत आहे.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. हि अनावश्यक गर्दी टाळणायसाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाने तसेच नाशिक मनपाने यावर उपाययोजना करीत पोलिसांकडून मार्किंग करण्यात आली आहे.

अत्यावश्यक वस्तू खरेदी साठी नागरिक एकच गर्दी करीत असल्याने आता सर्वत्र त्यावर उपाय योजना म्हणून दोन व्यक्ती मधेही अंतर ठेवून तशा प्रकारचे मार्किंग शहरात करण्यात आले आहेत. मेडिकल्स , भाजीपाला, किराणा, दूध विक्री केंद्र येथे अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. या मुळे सदर नियमांचे पालन करावे जेणेकरून आपल्याला गर्दी टाळता येईल.

Deshdoot
www.deshdoot.com