शहरात २१२ रिक्षा थांब्यांना पोलिसांची मंजुरी
स्थानिक बातम्या

शहरात २१२ रिक्षा थांब्यांना पोलिसांची मंजुरी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : शहरातील रिक्षांना उभेच राहण्यासाठी २०१५ मध्ये ठरविण्यात आलेल्या २६३ ठिकाणांपैकी २१२ ठिकाणांना अधिकृत रिक्षा थांबे म्हणून मंजुरी देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. मात्र गुरुवार (दि. १९) पासून एक महिन्यापुरतीच हि मंजुरी आहे.

शहरात २२ हजारांहून अधिक रिक्षा असून, रिक्षांच्या तुलनेत थांब्याची संख्या कमी आहे. रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त पथकाने शहरात सर्व्हे करून २६३ रिक्षा थांबे निश्चित केले होते, मात्र आजपर्यंत त्यावर निर्णय घेण्यात आलेला नव्हता. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरांमध्ये मान्यताप्राप्त थांबेच नसल्याची बाब गेल्या २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा निदर्शनास आणून दिली होती.

त्यामुळे समस्या सोडविणाच्या दृष्टीने २१२ रिक्षा थांबे अधिकृत करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतला आहे, मात्र दि. १९ डिसेंबर ते १९ जानेवारी या काळात नागरिकांकडून येणाऱ्या हरकती आणि सूचनांची नोंद घेऊनच या २१२ थांब्यांना कायमस्वरूपी रिक्षा थांबा म्हणून दर्जा देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या हरकती आणि सूचना लेखी स्वरूपात शारांपुर रोड येथील वाहतूक शाखेकडे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com