Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनिफाड : सायखेडा चेकपोस्टवर शिक्षक झाले ‘पोलीस’; करताय चार तासांची ड्युटी

निफाड : सायखेडा चेकपोस्टवर शिक्षक झाले ‘पोलीस’; करताय चार तासांची ड्युटी

सायखेडा : कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव पहाता पोलीस आणि आरोग्य यंत्रणेच्या मदतीला निफाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक धावले असून तालुक्यातील सीमेवर तयार करण्यात आलेल्या चेक नाक्यावर पोलीस यंत्रने सोबत शिक्षक आपले कर्तव्य बजावत आहे

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशान्वेय जिल्ह्यातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहे, मात्र अनेक स्थानिक नागरिक जीवनावश्यक वस्तूसाठी अथवा शेतकरी नाशिक येथे बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्रीसाठी जातात. त्यांची ओळख पटवण्यासाठी तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील कोणी येऊ नये यासाठी निफाड तालुक्यात सायखेडा त्रीफूली, पिंपळगाव टोल नाका, ओझर येथील दहावा मैल, विंचूर, चांदवड तालुक्याची सीमा, सिन्नर निफाड सीमारेषेवर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी होत आहे. या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता निफाड पंचायत समिती अंतर्गत काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी आपला राष्ट्रीय कामात सहभाग नोंदवला आहे.

- Advertisement -

तालुक्यातील अनेक शिक्षक दर चार तासांचा ड्युटी प्रमाणे ड्युटी करत आहे. प्रत्येक ठिकाणी दोन शिक्षक एक आरोग्य विभागाचा कर्मचारी आणि एक पोलिस अशा पद्धतीचे नियोजन उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे आणि तहसीलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी संदीप माळोदे, गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांनी केले आहे. त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत निफाड पंचायत समितीचे सर्व प्राथमिक शिक्षकांनी या कार्यात स्वतःला झोकून दिले आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तालुक्यातील सर्व सीमारेषा असलेल्या ठिकाणी चेक पोस्ट तयार करण्यात आली. प्रत्येक चेक पोस्टवर दोन शिक्षक एक पोलिस आणि एक आरोग्य विभागाचे कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. आरोग्य विभाग आणि पोलिस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता शिक्षकांना या कामास मदत म्हणून घेण्यात आले आहे. निफाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने या राष्ट्रीय कामात मदत करत आहे
-दिपक पाटील, तहसीलदार निफाड

- Advertisment -

ताज्या बातम्या