सुरगाणा : जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकावर पोलिसांची कारवाई
स्थानिक बातम्या

सुरगाणा : जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकावर पोलिसांची कारवाई

Gokul Pawar

हतगड : सुरगाणा पोलिसांनी सापळा रचत अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर धाड टाकत कारवाई केली.

लॉक डाऊनचा काळ असला तरी अवैध पद्धतीने वाहतूक होताना फासून येत आहे. अशातच सुरगाणा पोलिसांना अवैध पद्धतीने गोवंश जनावरांची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच त्वरित सापळा रचून पहाटे ४ वाजेच्या दरम्यान उंबरठाण येथे पिकअप (एम. एच. ०४ एफ. जे. २३६८) वाहनावर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत अडीच लाख रुपयांच्या महिंद्रा पिकअप वाहनांसह ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील गोवंश जनावरांना नजीकच्या गोरक्षण शाळेत हलवण्यात आले आहे. तर वाहनचालक व माल मालका विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला .

ही यशस्वी कारवाही ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण शर्मिष्ठा वाळावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे , यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिवानसिंघ वसावे, सहा.पो. नि.निलेश बोडके उपनिरीक्षक  सागर नांद्रे,सहा पोलिस उपनिरीक्षक हेमंत भालेराव,पो हवालदार  प्रभाकर सहारे, पो ना पराग गोतरणे, पो हवा वायकंडे, पो ना संतोष गवळी यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com