शहरात मास्क न वापरणार्‍या ११६ जणांवर पोलिसांची कारवाई

शहरात मास्क न वापरणार्‍या ११६ जणांवर पोलिसांची कारवाई

नाशिक : पोलीस आयुक्तांनी आदेश काढुनही गर्दीत मास्कचा वापर न करणाऱ्या ११६ नागरिकांना पोलिसांनी कायद्याचा दणका दिला. या नागरिकांवर कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरणाऱ्या मास्कला शहरात बंधनकारक करण्यात आले आहे.

याबाबत पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तसे आदेश काढले आहे. संचारबंदी काळात घराबाहेर पडण्यास मनाई असली तरी अत्यावश्यक बाबींची खरेदीसाठी मास्क लावून जाता येते. परंतु या ठिकाणी नागरिक गर्दी करत असल्याने तसच साजिक १ मिटरचे अंतर पाळत नसल्याने पोलीस हतबल झाले आहेत.

घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क असल्यास करोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुर्दैवाने याचे महत्त्व आजही अनेक नागरिकांना नाही. तोंडास मास्क अथवा रूमला न बांधता हे नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ि परिमंडळ मध्ये पोलिसांनी कारवाई केली.

१७ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या कारवाईत २७ जणांवर १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही परिमंडळातील पंचवटी, सरकारवाडा, सातपूर, भद्रकाली, मुंबईनाका, आडगाव, उपनगर, इंदिरानगर, अंबड, नाशिकरोड, गंगापूर, म्हसरूळ, देवळाली कँम्प यासर्वच पोलिस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई आणखी कडक करण्यात येणार असून, नागरिकांनी मास्क घालुनच घराबाहेर पाडावे असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com