पेठ : परंपरागत रूढींना फाटा देत प्रथम वर्षश्राद्धानिमित्त कवी संमेलन

पेठ : परंपरागत रूढींना फाटा देत प्रथम वर्षश्राद्धानिमित्त कवी संमेलन

नाशिक : रूढी व परंपराना फाटा देत कोटंबी (ता. पेठ) येथे कै.पार्वताबाई लक्ष्मण भुसारे यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त शुक्रवारी ( दि.७) आदिवासी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पेठ तालुक्यातील कोटंबी येथील भुसारे परिवाराने रूढी- परंपरा नाकारून वर्षश्राद्धानिमित्त हा आगळा वेगळा उपक्रम राबविणार आहे. त्यामुळे परिसरातून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी जि.प. शाळा व ग्रामस्थ यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला आहे.

या कवी रानकवी तुकाराम धांडे, कवी देवचंद महाले, कवी देवदत्त चौधरी, कवी तुकाराम चौधरी, कवी संजय दोबाडे,कवी भावेश बागुल आदींचा समावेश असणार आहे. तसेच या संमेलनात कथाकथन, आदिवासी लोककला, संस्कृती, रूढी परंपरा, आदिवासींच्या व्यथा यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com