मोदींच्या ‘दिया जलाव’ उपक्रमास ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद

मोदींच्या ‘दिया जलाव’ उपक्रमास ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद

नाशिक : पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला ग्रामीण भागातील जनतेने उस्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच नऊ मिनिटे स्तब्ध राहून कोरोना संकटाचा सामना करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले.

सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणू संकटाच्या भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. यावर सरकार सर्वोतोपरी उपाययोजना करीत आहेच, मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

देशातील कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी सायंकाळी नऊ वाजता आपल्या घरातील लाईट्स बंद करून दिवे लावण्यात आले. यावेळी शहरी भागासह ग्रामीण भागात रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी दिव्यांचा झगमगाट पाहायला मिळाला.

तर अनेक भागात लोकांनी दिवे लावून, फटाके फोडून पीएम मोदींच्या या आवाहानाला साथ दिली.
कोरोना विषाणूशी लढताना जनतेमध्ये एकजुटीचा संदेश जावा म्हणून पीएम मोदी यांनी हे आवाहन केले होते.

दरम्यान देशातील सर्व नागरिकांनीही मेणबत्ती, दिवे, मोबाईल फ्लॅशलाईट किंवा टॉर्च लावण्यास सांगितले होते. आता पंतप्रधानांच्या या आधीच्या टाळी व थाळी उपक्रमाप्रमाणे या दिव्यांच्या उपक्रमालाही तुफान प्रतिसाद मिळाला.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com