Saturday, April 27, 2024
Homeनाशिकजिल्हा बँकेतर्फे पीएम, सीएम सहाय्यता निधीला ३२ लाख

जिल्हा बँकेतर्फे पीएम, सीएम सहाय्यता निधीला ३२ लाख

नाशिक : करोना व्हायरसच्या विषाणूने देश व राज्यात थैमान घातले आहे. करोनामुळे  निर्माण झालेल्या स्थितीवर विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय तसेच निमशासकीय सेवक , स्ंस्थाना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

त्यामुळे नाशिक जिल्हा बँकही केंद्र आणि राज्याच्या मदतीसाठी पुढे धाऊन आली असून संचालक आणि बँकेच्या सेवकांनी करोनाच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला २१ लाखांची तर,पंतप्रधान आर्थिक सहायता निधीला ११ लाखांची आर्थिक मदत दिली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी मदतीचा चेक हस्तांतरीत केला.

- Advertisement -

सद्य स्थितीत जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली नाही.अशाही परिस्थितीत बँकेच्या सेवकांनी करोनाच्या लढाईत योगदान म्हणून केंद्र व राज्य सरकारला मदत केली आहे. ३० एप्रील रोजी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची झालेल्या ऑनलाईन बैठकीत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यासाठी बैठकीतही ठराव करण्यात आला होता.

सामाजिक बांधिलकीतून प्रतिसाद म्हणून ही मदत करण्यात आली आहे.त्यात पीएम केअर फंडासाठी ११ लाख तर मुख्यमंत्री सहाह्यता निधीसाठी २१ लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात बँकेच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसांचे १५ लाखांचे वेतनही समाविष्ट करण्यात आले आहे.मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला.

याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, बँकेचे ज्येष्ठ संचालक गणपतराव पाटील , माजी राज्यमंत्री डॉ शोभा बच्छाव, परवेज कोकणी, संदीप गुळवे , नामदेव हलंकदर अादी संचालक तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खरे व बँक सेवक संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

सेवकांना सॅनेटायझर व मास्क
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत संरक्षानात्मक उपाययोजना म्हणून बँकेच्या सर्व सेवकांना प्रत्येकी दोन सॅनेटायझर व दोन मास्क देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या