फाळके स्मारकाची होणार डागडुजी; भुजबळ यांच्याकडून पाहणी

फाळके स्मारकाची होणार डागडुजी; भुजबळ यांच्याकडून पाहणी

नाशिक : नाशिकच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या दादासाहेब फाळके स्मारकामध्ये झालेल्या दुरावस्तेबाबत आज पालकमंत्री भुजबळ यांनी पाहणी करत फाळके स्मारकाच्या दुरुस्तीबाबतची कामे तातडीने पूर्ण करून पर्यटकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले आहे.

नाशिक शहरात २८ एकरांवर बांधलेल्या भव्य ‘फाळके स्मारक’ प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरलेल्या फाळके स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत होती.

याबाबत तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. याची तातडीने दखल घेत ना.छगन भुजबळ यांनी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासोबत फाळके स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला व त्यांच्यासमवेत आज फाळके स्मारकाची पाहणी केली.

या पाहणी दरम्यान ना.छगन भुजबळ यांनी फाळके स्मारकांमधील वस्तूंची झालेली दुरावस्था, कलादालन साहित्य, खुले चित्रपट गृह, दादासाहेब फाळके चित्ररूपी जीवनपटाची झालेली दुरावस्था, नागरिकांच्या बैठकीसाठी असलेले बाकडे, गार्डन, पाण्याचे फवारे, बंद पडलेली म्युझिक सिस्टीम, सभागृह, थियटरची झालेली दुरावस्था, स्टेजची झालेली दुरावस्था यासह दादासाहेब फाळके यांची माहिती पटाचे नव्याने पोस्टर, दुर्मिळ छायाचित्र नव्याने तयार करून लावणे तसेच येथील सुरक्षिततेबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश ना.छगन भुजबळ यांनी आयुक्तांना दिले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com