अर्थसंकल्पदिनी पेट्रोल-डिझेलच्या दरात १४ पैशांनी वाढ
स्थानिक बातम्या

अर्थसंकल्पदिनी पेट्रोल-डिझेलच्या दरात १४ पैशांनी वाढ

Gokul Pawar

नाशिक । अर्थसंकल्पदिनी पेट्रोल-डिझेलच्या दरात 14 पैसे वाढघरगुती गॅस सिलेंडरच्या किमती जैसे थे; व्यावसायिक सिलेंडर 225 ने वाढलेनाशिक । दि.1 प्रतिनिधीकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज दि.1 देशाचा अर्थसंकल्पसादर करण्याच्या तयारीत असताना पेट्रोल आणि डिझेलच्या दारात प्रति;लिटर 15 पैशांची वाढ झाली.

व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत देखील तब्बल 225 रुपयांची वाढ करण्यात आली असून सर्वसामान्यांना व गृहिणींनामात्र दिलासा देणारी घटना घडली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सतत वाढणार्‍या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणतीही वाढ झाली नसून जानेवारीप्रमाणेच या महिन्यात देखील 705.50 रुपयांना मिळणार आहे.आजच्या अर्थसंकल्पाकडे अवघ्या देश वासियांचे लक्ष लागलेले असताना इंधन दरात वाढ झालेली बघायला मिळाली.

गेला संपूर्ण आठवडा उतरत्या असणार्‍या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर 14 पैशांची वाढ झाल्याने नाशिकमध्ये पेट्रोल 79.06 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 68.57 पैसे लिटर दराने विकण्यात येत होते. अनुदानित घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमती गेल्या पाच महिन्यांपासून सतत वाढत्या राहिल्याने सर्वसामान्य आणि गृहिणींच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र आज 14.20 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणतीही वाढ न झाल्याने जानेवारीतील किमतीलाच ते विकत घ्यावे लागणार आहे.

असे असले तरी व्यावसायिकांना मात्र मोठा दणका देण्यात आला असून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत मात्र मोठी वाढ झाली आहे. जानेवारीत 1325 रुपयांना मिळणारे हे सिलेंडर 224.98 रुपयांनी महागले असून 1550 रुपयांना आता विकत घ्यावे लागणार आहे.

अशी राहिली घरगुती सिलेंडरची दरवाढ
सप्टेंबर मध्ये 15.30 रुपयांनी वाढलेली किंमत 583 रुपये होती. त्यात ऑक्टोबरमध्ये 13 रुपये, नोव्हेंबरमध्ये 76.50 रुपये डिसेंबरमध्ये 686.50 रुपये तर जानेवारीत 19 रुपयांची वाढ होऊन सिलेंडर 705 रुपयांवर पोहोचले होते. या महिन्यात दरवाढ न झाल्याने सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com