पेठ- दिंडोरी बसला आंबेगणजवळ अपघात
स्थानिक बातम्या

पेठ- दिंडोरी बसला आंबेगणजवळ अपघात

Gokul Pawar

Gokul Pawar

पेठ/ गोळशी : पेठहुन दिंडोरीकडे जाणाऱ्या एसटी बसला राष्ट्रीय महामार्गावरील आंबेगण जवळ अपघात झाला. सोमवारी (दि. १७) सकाळी साडे सातच्या सुमारास हा अपघात घडला.

दरम्यान दिंडोरी तालुक्यातील आंबेगण शिवारात उमराचा माथा येथे हा अपघात घडला. बस क्रमांक (एमएच ०७ सी ९५१५) हि बस पेठहून दिंडोरी कडे जात असतांना स्टिअरिंग लॉक झाल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात पाच गंभीर तर चार किरकोळ जखमी झाले आहेत. परंतु बसचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दिंडोरी पोलिस ठाण्यात या अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास दिंडोरी पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या मार्ग दर्शनाखाली उपपोलिस निरीक्षक चव्हाण पोलीस नाईक, बाळकृष्ण पजई, संजय गायकवाड करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com