पंचवटी : अनावधानाने हँडब्रेक ओढल्याने कार थेट नदीपात्रात
स्थानिक बातम्या

पंचवटी : अनावधानाने हँडब्रेक ओढल्याने कार थेट नदीपात्रात

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : गंगाघाटावर आज सकाळच्या सुमारास गाडीचा हँडब्रेक सुटल्याने थेट गाडी नदीपात्रात जावून तरंगली. यावेळी परिसरात गाडी तथा वर्दळ नसल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र गाडीमालकाच्या मनात मात्र चांगलीच धडकी भरली.

दरम्यान सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गंगाघाटावर आलेल्या पर्यटकांपैकी मध्यप्रदेशातील एका पर्यटकांची इंडिका कार पार्क करण्यात आली होती. यावेळी गाडीमध्ये दोन लहान मुले आणि एक महिला बसलेली होती. अचानक लहान मुलाने गाडीचा हँड ब्रेक ओढला. अन् त्याननंतर गाडी चालकाशिवाय धावू लागली. त्यामुळे गाडीत बसलेल्या महिलेची चांगलीच तारांबळ उडाली. बाजूलाच या सोबत असणाऱ्या पुरुषमंडळींनी आरडाओरड करेपर्यंत गाडी थेट नदीपात्रात उतरली होती.

यावेळी कारच्या समोर अन्य वाहने नसल्याने मोठा अनर्थ टळला.

Deshdoot
www.deshdoot.com