येवला तालुक्यात रात्रभर पाऊस, वीज गायब; भुजबळ नुकसानीचा आढावा घेणार
स्थानिक बातम्या

येवला तालुक्यात रात्रभर पाऊस, वीज गायब; भुजबळ नुकसानीचा आढावा घेणार

Gokul Pawar

येवला : तालुक्यातही निसर्ग वादळाचा फटका बसला असून अंदरसुल येथे मोठे नुकसान झाले आहे. येथील गजानन देशमुख यांच्या पोल्ट्री फॉर्मचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. उघड्यावर आलेल्या सुमारे दीड हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आज सकाळी ११ वाजता येवल्यात येत असून ते तालुक्यातील नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

निसर्ग चक्रीवादळ येवल्यात दुपारच्या सुमारास आले. त्याने अंदरसुल परिसरात थैमान घालून अनेक घरांची पत्रे, पोल्ट्री फार्म, झाडे यांचे नुकसान केले.

शहरासह तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी दिवसभर कोसळत होत्या. मात्र रात्री आठ साडेआठ वाजेनंतर झटक्याच्या वादळासह पावसाला सुरुवात झाली. त्यात दिवसा अनेकवेळा वीज पुरवठा खंडित झाला.

निसर्ग वादळाच्या व जोरदार पावसाच्या तडाख्या मूळे घरांची पडझड तसेच शेतकरी बांधवांच्या पत्र्याच्या शेड उडून गेली या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आज दि. ४ जून रोजी सकाळी ११ वाजता नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत.

त्यानंतर येवला येथील संपर्क कार्यालय येथे निसर्ग वादळाच्या प्रभावाबाबत तसेच जगाला हादरविणाऱ्या करोना संकटाच्या उपाययोजना बाबत आणि खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत आढावा बैठक घेणार आहेत. अशी माहिती स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com