कोरोनाला रोखण्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्‍टरांना ‘ऑनलाइन’ प्रशिक्षण

कोरोनाला रोखण्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्‍टरांना ‘ऑनलाइन’ प्रशिक्षण

नाशिक : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्‍यक ते प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्‍टरांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे.

आवश्‍यकता भासल्यास राज्यात आरोग्यसेवेसाठी पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ असावे, यासाठी राज्यातील आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी या आयुष डॉक्‍टरांची सेवा घेता यावी, याकरिता त्यांना आठवडाभरात कोरोनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देणे सुरू करण्यात आले आहे.

नुकतेच आयुषच्या २५० मुख्य प्रशिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्‍टरांना प्रशिक्षण दिले जात आहे.

सध्या नागरिकांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी योग्य आहार, व्यायाम, परेशी झोप, यासोबतच क जीवनसत्व असलेल्या फळांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन करताना नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. घराबाहेर पडू नये. जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असे यंत्रणेने सांगितले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com