लासलगाव : कांदा बाजार भावात १०० रुपयांची सरासरी दरात घसरण

लासलगाव : कांदा बाजार भावात १०० रुपयांची सरासरी दरात घसरण

लासलगाव : राज्यात मान्सून दाखल झाल्याचे कुलाबा वेध शाळेकडून जाहीर करण्यात आले अनेक ठिकाणी पाऊस होत असल्याने बळीराजाची पावसाळी पीक घेण्यासाठी लगबग सुरू झाली असताना दुसरीकडे कांद्याची आवक दररोज वाढत असल्याने लासलगाव बाजार समिती गेल्या दोन दिवसांपासून कांद्याचे वाढलेल्या दर वाढीला ब्रेक लागत कांदा बाजार भावात १०० रुपयांची सरासरी दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादकांमध्ये कमालीची नाराजगी पसरली आहे.

गेल्या अडीच महिन्यांपासून करोनामुळे लॉक डाऊन असल्याने कांद्याची मागणी घटल्यामुळे त्याचा थेट फटका बसत बाजार भावात घसरण झाल्याने कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला होता, मात्र देशांतर्गत अनलॉक केल्याने अनेक ठिकाणी बाजार सुरु झाल्याने कांद्याची मागणी वाढली. तसेच हॉटेल मधून पार्सल सुरू झाल्याने कांद्याच्या बाजार भावात २०० ते ३०० रुपयांची वाढ होत कांद्याचे जास्तीजास्त दर १ हजार रुपयांच्या पुढे गेलं तर सरासरी दरात चांगली वाढ झाली,

मात्र कांद्याची दररोज बाजार समित्यांमध्ये आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने या आठवड्यात बुधवारी ९५१ रुपये इतका सरासरी कांद्याला बाजार भाव मिळाला होता. आज शुक्रवारी ८५१ रुपये इतका प्रतिक्विंटल सरासरी कांद्याला बाजार भाव मिळाला आहे. १०० रुपयांची सरासरी दरात घसरण झाली.

ही घसरण अशीच सुरु राहिल्यास कांदा उत्पादक पुन्हा पावसाळ्याच्या तोंडी आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त करत कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी १० टक्के अनुदान देण्याची गरज असल्याचे या क्षेत्रातील तज्ञ जयदत्त होळकर यांनी केली आहे.

लासलगाव बाजार समिती ११२८ वाहनातून २१, ४६०क्विंटल कांद्याची आवक झाली होती जास्तीतजास्त १०८० रुपये, सरासरी ८५१ रुपये कमीतकमी १०० रुपये प्रतिक्विंटल कांद्याला बाजार भाव मिळाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com