नांदगाव : पिकअप वरचा ताबा सुटून झाडावर आदळल्याने एकाचा मृत्यू
स्थानिक बातम्या

नांदगाव : पिकअप वरचा ताबा सुटून झाडावर आदळल्याने एकाचा मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

नांदगाव : नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळून एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. शास्त्रीनगर फाट्यावर पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चालक दत्तु निबा आहिरे (वय ३२) असे मृत इसमाचे नाव असून अन्य एक जण या अपघातात जखमी झाला आहे.

शुक्रवारी इगतपुरी येथून केळी खाली करून परतीचा प्रवास करणारी पिकअप गाडी क्रमांक (एम.एच.०६ बी.जी.०७५६) होती. मनमाड -नांदगाव रोडवरील शास्त्रीनगर येथील फाट्यावर आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यावर पिकअप कडुनिंबाच्या झाडावर जावून आदळली.

या अपघातात चालक दत्तु आहिरे यांस तोंडास व छातीत गंभीर मार लागल्याने त्यास नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याद मयत झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.

याप्रकरणी नांदगाव पोलिसात उमेश भगवान पाटील( रा.बोरखेडे ता.चाळीसगाव) यांनी फिर्याद दाखल करण्यात आले असून भादंवी ३०४(अ),२७९,३३७,३३८,४३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.ना.दिपक आव्हाड करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com