देवळा : रामेश्वर फाट्यानजीक ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार
स्थानिक बातम्या

देवळा : रामेश्वर फाट्यानजीक ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार

Gokul Pawar

देवळा : नाशिक रस्त्यावरील रामेश्वर फाट्यानजीक झालेल्या ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

रविवारी रात्री साडे नऊ दहा वाजेच्या दरम्यान रामेश्वर फाट्यानजीक असलेल्या इंडियन ऑईलच्या समृध्दी पेट्रोप पंपाजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकींचा अपघात झाला आहे. बागलाण तालुक्यातील वाघळे येथील ट्रॅक्टर कांदे विक्रीसाठी पिंपळगाव येथे जात असताना देवळ्याच्या दिशेने येत असणाऱ्या दुचाकीला धडक बसल्याने अपघात झाला.

या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. मृत दुचाकीस्वार हा देवळा तालुक्यातील चिंचवे येथील श्रीकांत सुनील शिंदे हा २३ वर्षीय युवक असल्याचे समजते.

Deshdoot
www.deshdoot.com