आडगाव परिसरात विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू
स्थानिक बातम्या

आडगाव परिसरात विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : घराचे पत्रे दुरूस्त करत असताना मशीनच्या वायरमधून विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.३१) सकाळी आडगाव परिसरात घडली.

गणेश राजेश गुंजाळ (२२, रा. आडगाव बसस्टॉपजळ, ता. नाशिक) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश हा त्यांच्या राहत्या घराचे पत्रे दुरूस्ती करत होता. पत्रे खोलण्याच्या मशीन द्वारे काम करीत असताना विजेचा धक्का त्याच्या उजव्या तळहातास लागला.

यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. पंरतु तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून घोषीत केले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com