एबीबी सर्कलजवळ कार-दुचाकी अपघातात एक ठार
स्थानिक बातम्या

एबीबी सर्कलजवळ कार-दुचाकी अपघातात एक ठार

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीचालक ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.7) सायंकाळी एबीबी सर्कल सिग्नल बसस्टॉप जवळ घडली. संदीप अभिमान जाधव (38, रा.शिवाजीनगर, सातपूर) असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संदीप जाधव हे दुचाकी(एमएच 15-जीसी-3983)वरुन पत्नी व मुलांसह त्र्यंबकरोडने घराच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव कारने धडक दिली.

या अपघातात संदीप जाधव गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस हवालदार बी. आर. बोळे करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com