सिन्नर : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक ठार
स्थानिक बातम्या

सिन्नर : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक ठार

Gokul Pawar

Gokul Pawar

सिन्नर : वस्तीवरून गावात जाण्यासाठी निघालेल्या ५४ वर्षीय व्यक्तीचा दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि. ३० सकाळी आठ वाजेच्या सुमारास खोपडी येथे घडली.

ज्ञानेश्वर भिकाजी थोरात हे सकाळी खोपडी शिवारातील आपल्या घरून दुचाकीवरून गावाकडे जाण्यास निघाले होते. घरापासून अवघे १०० मीटर अंतर गेल्यावर वळणार अचानक दुचाकी घसरली. या अपघातात थोरात यांच्या छातीवर जोराचा आघात होऊन त्यातच त्याचा अंत झाला.

अपघात घडल्यावर लगेचच त्यांच्या कुटुंबीयांनी व परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत त्यांना उपचारासाठी सिन्नरला नेले. मात्र तेथे पोहोचण्या पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

थोरात हे मुसळगाव येथील रिंग प्लस ऐक्वा या कंपनीत नोकरीला होते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com