पोलीसांच्या ताब्यातील एकाचा चक्कर येऊन मृत्यू

पोलीसांच्या ताब्यातील एकाचा चक्कर येऊन मृत्यू

नाशिक : भांडण करणार्‍या दोघांना भद्रकाली पोलीसांनी चौकशीसाठी बोलावलेल्या व्यक्तींपैकी एकाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.२१) गंजमाळ येथील पोलीस चौकी जवळ घडली.

गणेश लक्ष्मण ढगळे (35, रा. भिमवाडी, गंजमाळ) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा मामे भाऊ श्रवण काशिनाथ निसाळ (26, रा. पंचशिलनगर, भद्रकाली) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार भिमवाडी निसाळ व ढगळे यांचे गरुवारी सकाळी किरकोळ कारणातून भांडण होऊन मारहाण झाली होती. या दरम्यान तेथून गस्त घालत असलेल्या भद्रकाली पोलीसांच्या पथकाने त्या दोघांना चौकशीसाठी गंजमाळ येथील पोलीस चौकीत नेले होते. त्यांना चौकीजवळ बसवुन ठेवण्यात आले होते.

या ठिकाणी तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी ढगळे हा समोरील घराकडे गेला होता. हॉटेलबाहेरच त्यास चक्कर येऊन तो खाली पडल्याने त्यास तात्काळ पोलीसांनी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलेे. परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून घोषीत केले.

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com