अंबड : झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू
स्थानिक बातम्या

अंबड : झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू

Gokul Pawar

नाशिक। चिंचेच्या झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यु झाल्याची घटना अंबड शिवारातील खालच्या चुंचाळे येथे घडली.

गणपत सहादू निंबाळकर (50, रा. खालचे चुंचाळे, अंबड) असे नाव या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे ना आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गणपत निंबाळकर हे गावातील मंदिराजवळ असलेल्या चिंचेच्या झाडावर चिंच तोडण्यासाठी चढले होते. मात्र त्याचा तोल जाऊन ते खाली पडले.

गंभीर जखमी अवस्थेतील गणपत यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com