‘शिवभोजन’साठी नाशिक विभागाला एक कोटी अनुदान
स्थानिक बातम्या

‘शिवभोजन’साठी नाशिक विभागाला एक कोटी अनुदान

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । शिवभोजन थाळीला रविवार (दि.26) पासून शुभारंभ होणार आहे. जिल्ह्यात चार केंद्रांवर ही थाळी मिळेल. त्यात शहरात तीन तर मालेगाव तालुक्यात एका ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून या योजनेसाठी नाशिक विभागाला 1 कोटी 8 लाख अनुदान प्राप्त झाले आहे. त्यात नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक 36 लाख अनुदान मिळाले आहे.

शिवभोजन थाळीचा खर्च हा 50 रुपये आहे. तरीही गरिबांना दहा रुपयात जेवण दिले जाणार आहे. ही थाळी पुरवणार्‍या शासनाकडून प्रतिथाळीमागे 40 रुपये सबसिडी दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेच्या कॅन्टिनमध्ये शिवथाळी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

याशिवाय नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरातील दीपक हॉटेल, पंचवटीतील बाजार समितीजवळील बळीराजा हॉटेलमध्ये बचतगटाच्या माध्यमातून ही थाळी उपलब्ध होणार आहे. मालेगावातही बाजार समिती परिसरात साई श्रद्धा बचतगटाला जेवण पुरवण्याचे काम देण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com