Friday, April 26, 2024
Homeनाशिककौतुकास्पद : आईच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी ‘तो’ उतरला करोना लढाईत

कौतुकास्पद : आईच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी ‘तो’ उतरला करोना लढाईत

नाशिक : करोना मुळे मोठे संकट जगासमोर उभे ठाकले आहे. या संकटातून मानवाला वाचवण्यासाठी डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस अशी अनेक लोक आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. अशाच प्रकारे गरजूंना सामान्य नागरिकही जीव धोक्यात घालून मदत करीत आहेत.

या योध्यांपैकीच एक म्हणजे रमाबाई नगर, मुंबई येथे राहणारा २५ वर्षीय रोहित जगताप आहे. हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेला रोहित आपल्या सहकाऱ्यांसोबत अन्न-धान्या वाचून कोणाची उपासमार होऊन नये म्हणून गरजूंना घरोघरी जाऊन रेशनच्या किट वाटप करतो आहे. महत्वाचे म्हणजे दोन दिवसांपूर्वी च रोहितच्या आईचे निधन झाले आहे. निधन झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून तो गरजूंना मदत करीत आहे.

- Advertisement -

रोहित आणि त्यांचा ग्रुप हे सर्व सामान्य घरातील असून गेल्या महिनाभरापासून जेवण वाटप करीत आहेत. त्याचे सहकारी मिळून जेवण तयार करून गरजूंना वाटायचे कार्य सुद्धा मोठ्या प्रमाणावर करत आहेत. रोहितने आतापर्यंत आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून मुंबईतील दोन हजारच्या जवळपास गरजू कुटुंबांना रेशन किटचे वाटप केले आहे. या कठीण काळात जनतेसाठी उभा असलेल्या रोहितच्या आईचे छत्र हरविल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही थांबला नाही. आईच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी पुन्हा गरजूंच्या मदतीच्या कार्यात सक्रिय झाला.

करोना लॉकडॉऊन मुळे सर्वकाही बंद आहे. त्यामुळे देशातील एक खूप मोठा वर्ग ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांची लॉकडॉऊन मुळे उपासमार व्हायची वेळ आली आहे. अशावेळी जी लोक आपला जीव धोक्यात टाकून या सर्व गरजूंना मदत म्हणून अन्न-धान्य पुरविण्यासाठी काम करत आहेत ते सर्व सुद्धा कोरोनाच्या लढाईतील महत्वाचे योद्धे आहेत. भूकेसोबत लढणारे हे योद्धे आहेत, कोरोना काळात कोरोना आधी भूकच या देशाला हरविणार नाही याची काळजी हि लोक घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या