मेनरोडवरील बंद वाड्याची भिंत कोसळली; जीवित हानी नाही
स्थानिक बातम्या

मेनरोडवरील बंद वाड्याची भिंत कोसळली; जीवित हानी नाही

Gokul Pawar

Gokul Pawar

जुने नाशिक । येथील मेनरोड वरील चित्रमंदिर चित्रपट सिनेमा जवळच्या दत्ता वाघ यांचा रिकाम्या असलेल्या वाड्याची भिंत कोसळली. मात्र जीवित हानी झाली नाही.

जुने नाशिकच्या जुन्या व धोकादायक वाड्यांचा प्रश्न कायमचा मार्गी लागवा यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे. मात्र अद्याप काही ठोस काम न झाल्याने सतत वाडे पहण्याचे सत्र सुरूच आहे. मनपा प्रभाग 13 मधील मेनरोड वरील चित्रमंदिर सिनेमाजवळील बंद वाड्याच्या भिंतीचा मोठा भाग शुक्रवारी (दि.31) रात्री 11 वाजेच्या सुमारास कोसळला.

महापालिका अग्निशमन दलाला कॉल येताच त्वरित गाड्या रवाना करुन जवानांंनी मदत कार्य सुरू केले. जवानांनी वाड्याची पाहणी करून काही धोकादायक झालेला भाग लोखंडी बारच्या सहाय्याने पाडला. तसेच रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. दरम्यान, वाड्याची भिंती रिकाम्या जागात कोसळलीमुळे या दुर्घटनेत जीवितहानी टळली; मात्र या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

Deshdoot
www.deshdoot.com