सातपूर : गळफास लावून घेत वृद्धेची आत्महत्या

सातपूर : गळफास लावून घेत वृद्धेची आत्महत्या

नाशिक। राहत्या घरी गळफास लावून घेत ७० वर्षीय वृध्देने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. विशणीदेवी ठक्कण कामटी (७० रा.दत्तमंदिरजवळ,शिवाजीनगर) असे मृत वृध्देचे नाव आहे.

विशणीदेवी कामटी यांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा कारी कामटी याने त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार पठाण करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com