Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रनवे १५ रुग्ण दाखल; राज्यातील संशयित रुग्णांची संख्या ८९ वर

नवे १५ रुग्ण दाखल; राज्यातील संशयित रुग्णांची संख्या ८९ वर

नाशिक : महाराष्ट्रात कोरोनाचा व्हायरसच्या संक्रमितांचा आकडा वाढत आहे. आज सोमवार (दि.२३) रोजी कोरोनाचे नवे १५ संशयित रुग्ण आढळून आले आहे. या १५ पैकी १४ नवे रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत तर १ रुग्ण पुणे येथील आहे. या संख्येंनंतर राज्यातील संशयित रुग्णांची संख्या ८९ वर गेली आहे. याबाबत महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली.

दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने हे नवे रुग्ण बाधित झाले आहे. कोणतीही लागण ही थेट झालेली नाही. त्यामुळे आकडा वाढला असला तरी लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही असेही टोपे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही शहरातील काही ठिकाणी अजूनही लोकांची गर्दी ओसरत दिसत नाही. यामुळे नागरिकांनी स्वतःसह इतरांना धोक्यात न टाकता घरीच थांबणे हितकारक आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारचे आदेश गांभीर्याने पाळावेत अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल असा थेट इशाराही टोपे यांनी दिला आहे.

तसेच आरोग्यमंत्री टोपे म्हणाले कि राज्यासमोर रक्ताचा मोठा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. राज्याकडे पुढील १५ ते २० दिवस पुरेल इतकेच रक्त आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करावे, असे अवाहन करण्याचे करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या