जिल्हाधिकारी कार्यालयात १०१ सेवांची अधिसूचना लागू; राज्यातील पहिले व एकमेव कार्यालय
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात १०१ सेवांची अधिसूचना लागू; राज्यातील पहिले व एकमेव कार्यालय

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने ८१ सेवा समाविष्ट करण्यात आल्या असून यामुळे पूर्वीच्या २० आणि स्वयंस्फूर्तीने घोषित केलेल्या नव्या ८१ अशा १०१ सेवांची अधिसूचना आजपासून लागू करण्यात आली आहे.

दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी या सेवांची माहिती दिली. या १०१ सेवांची अधिसूचनेची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दर्शनी भागावर तसेच उपविभागीय व तहसील कार्यालयामध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे  १०१ सेवांची हमी देणारे राज्यातील नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय हे पहिले व एकमेव कार्यालय ठरले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com