नाशिक नोट प्रेस व प्रतिभूती मुद्रणालय 31 मार्च पर्यंत बंद

नाशिक नोट प्रेस व प्रतिभूती मुद्रणालय 31 मार्च पर्यंत बंद

नाशिक : कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. या रोगाचा फैलाव अजून होऊ नये यासाठी महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सुविधा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यातच आता नाशिकमधील नोटा छापण्याचा कारखानाही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. कामगार संघटना आणि महामंडळ मिळून हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती या संघटनेचे प्रमुख जगदिश गोडसे यांनी दिली आहे.

नाशिकमधील नोटा छपाई कारखान्यातील कामगार आणि कर्मचा-यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ‘आम्ही आमचे ९९% काम २० मार्चपर्यंत पूर्ण केले आहे’, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे जगदीश गोडसे यांनी सांगितले आहे.

नाशिकमधील नोटा छापण्याचा कारखानाही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. कामगार संघटना आणि महामंडळ मिळून हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती या संघटनेचे प्रमुख जगदिश गोडसे यांनी दिली आहे.

दरम्यान प्रेस चा इतिहासात आतापर्यंत २ वेळा दोन्ही प्रेसचे कामकाज बंद पडले आहे. या पूर्वी बोनस चा मागणी साठी प्रेस मध्ये कामकाज बंद होते. त्यामुळे सुमारे २१ दिवस उत्पादन होउ शकले नव्हते. आता कोरोना च्या पार्श्वभूमिवर दुसऱ्यांदा दोन्ही प्रेस चे कामकाज बंद पडले आहे. करेंसी नोट प्रेस मधे ५,१०,२०,५०,१००,२००,५०० या नोटंची छपाई होते. तर सिक्योरिटी प्रेस मधे विविध प्रकारचे स्टैम्प छापले जातात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com