नाशकात ‘नो करोना’; सर्व ६० अहवाल निगेटिव्ह

नाशकात ‘नो करोना’; सर्व ६० अहवाल निगेटिव्ह

नाशिक | जगभरात करोना विषाणुने दहशत पसरवली असून परदेशातून येणार्‍या नागरीकांवर विशेष लक्ष दिले जात आहे. जिल्ह्यात येणार्‍या परदेशी नागरीकांचा ओघ वाढतच असून नाशिक जिल्हात आतापर्यंत ५१७ परदेशी नागरीक दाखल झाले आहेत. असे असले तरी जिल्हात आतापर्यंत दाखल झालेल्या करोना सर्वच्या सर्व ६० संशयितांचे अहवाल निगेटिव्हा आले आहेत. तर आज दिवसभरात जिल्हाभरातून एकही संशयित दाखल झालेला नाही. यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने करोना संसर्गग्रस्त असे घोषीत केलेल्या १० देशांतील नागरीकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी तसेच नागरीक नोकरी व उद्योगानिमित्त परदेशात आहेत. तर अनेक उद्योजग, व्यावसायिक सातत्याने परदेशांमध्ये दौरे करत असतात. विविध देशातून जिल्ह्यात आतापर्यंत दाखल झालेल्या नागरीकांची संख्या ५१७ झाली आहे. यात करोनाग्रस्त देशांतील २७८ जणांचा सामावेश आहे. तर उर्वरीत इतर देशातून आले आहेत. असे असले तरी सर्वांवर आरोग्य यंत्रणेचे लक्ष आहे.

परेदशातून आलेल्या नागरीकांपैकी ४११ रूग्णांवर आरोग्य विभागाची रूग्णाय तसेच त्यांच्या घरी देखरेख आहे. आतापर्यंत ६० संभाव्य संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले असून सर्वच्या सर्व ६० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती आरोय प्रशासनाने दिली. शासकीय रुग्णालयात आज दिवसभरात नव्याने एकाही संभाव्य कोरोना संशयित रुग्ण दाखल झालेला नाही.

करोनाची जिल्ह्यातील काडेवारी
* आतापर्यंत परदेशातून आलेले नागरिक – ५१७
* आतापर्यंत सर्वेक्षणाखाली असलेले – ४११
* १४ दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले – १०६
* आजपर्यंत दाखल – १०६
* स्वॅब तपासणी – ६०
* निगेटिव्ह – ६०

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com