नाशिक : प्रभाग २२ मधून महाविकास आघाडी तर २६ मधून शिवसेनेचा उमेदवार विजयी
स्थानिक बातम्या

नाशिक : प्रभाग २२ मधून महाविकास आघाडी तर २६ मधून शिवसेनेचा उमेदवार विजयी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग २२ मधून महाविकास आघाडीचे जगदीश पवार तर प्रभाग २६ मधून शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले आहेत.

दरम्यान महानगरपालिकेची पोटनिवडणुकीचे मतदान गुरुवारी (दि. ०९) झाले. त्यानंतर आज सकाळी 10 वाजेपासून सातपूर क्लब हाऊस येथे मतमोजणीला सुरवात झाली होती. दरम्यान प्रभाग २६ मध्ये शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झले असून त्यांनी दिलीप दातीर यांचा पराभव केला आहे. यामध्ये अनुक्रमे मधुकर जाधव ५८६५, दिली दातीर ३०५३,  कैलास अहीरे १०२१ अये मतदान झाले आहे.

तर प्रभाग २२ मध्ये महाविकास आघाडीचे जगदीश पवार यांनी बाजी मारली आहे. या ठिकाणी जगदीश पवार यांना ४९१३, भाजपा बंडखोर उमेदवार रामदास सदाफुले १०७१ , अरुण गिरजे ३९६, नितीन जगताप ४०५, सारिका कीर २२०, जितेंद्र लासुरे २३६, मनोज सातपुते १४७२, भाजपाच्या अधिकृत उमेदवार विशाखा शिरसाट १५२५ अशी मते मिळाली आहेत तर नोटाचा पर्याय १५० मतदारांनी निवडला आहे.

प्रभाग २२ मध्ये पल्लवी निर्मळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तर प्रभाग २६ मध्ये निवडणूक अधिकारी म्हणून डॉ.अरविंद आंतुर्लीकर हे होते.

Deshdoot
www.deshdoot.com