नाशिक शहरात आज नवीन नऊ करोना रुग्ण
स्थानिक बातम्या

नाशिक शहरात आज नवीन नऊ करोना रुग्ण

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : नाशिक महानगरपालिका क्षेत्रात करोना रुग्णांचा आकडा वेगात वाढत असुन आज (दि.२७) रोजी सायकांळपर्यत दिवसभरात नवीन नऊ करोना बाधीत आढळून आले आहे.

विशेष म्हणजे हे शहरातील अगोदरच्याबाधीत रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्तीतील आहे. यामुळे आता महापालिका प्रशासनाकडुन संसर्ग वाढला जाऊ नये म्हणुन तातडीच्या उपाय योजना केल्या जात आहे.
मंगळवारी (दि.२६) एका दिवसात १३ करोना रुग्ण वाढले होते. यानंतर आज सकाळपर्यत नाशिक शहरातील रुग्णांचा आकडा १२८ इतका झाला होता. तसेच शहरातील मृतांची संख्या ८ झाली आहे. गेल्या काही दिवसात शहरातील बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या व्यक्तीं या बाधीत होऊ लागल्या असल्याची बाब समोर आली आहे.

विशेषत: शहरातील हॉटस्पॉट बनलेल्या संजीवनगर, वडाळागांव, रामनगर पेठरोड, क्रांतीनगर, नाशिकरोड व दिंडोरीरोड या भागातील नवीन रुग्ण सापडत आहे. पंचवटी महालक्ष्मी थिएटर मागील भागात राहणार्‍या हॉटेल चालकांना करोना झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील ४ जणांना करोना झाला असुन यात एक युवक आज सकाळी पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बाहेरगावाहून आलेल्या बळीमंदिर भागातील सरस्वतीनगर भागातील एक व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आला आहे.

ही व्यक्ती आपल्या नातेवाईकाच्या अंत्ययात्रेवरुन आल्यानंतर त्यास बाधा झाल्याची चर्चा असुन ही व्यक्ती राहत असलेली शाम प्राईड अपार्टमेंट सरस्वतीनगर बलरामनगर हा रो हाऊस प्रतिबंधीत करण्यात आला आहे. नंतर सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास आलेल्या अहवालात नाशिक पोलीस हेडक्वार्टर येथील नाशिक ग्रामीण पोलीस दलातील सेवकाला बाधा झाली आहे.

त्यानंतर पावणेसात वाजता आलेल्या अहवालात पंचवटीतील राहुलवाडी येथील २५ वर्षीय युवक, नाशिक भाजी मार्केट मधील ४० व २७ वर्षीय व्यक्ती, नाशिकरोड दत्तमंदिर भागातील १७ वर्षीय युवती व ३६ वर्षीय महिला अशांना बाधा झाल्याचे समोर आले. तसेच यानंतर नवीन नाशिक भागातील दिपालीनगर येथील एका नमुना पॉझिटीव्ह आला आहे.

अशाप्रकारे आज सायंकाळपर्यत ९ नवीन करोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. हे सर्वच बाधीत क्रांतीनगर मार्केट काम करणार युवक, हॉटेल चालक, नाशिकरोड आशिर्वाद स्टॉप व नवीन नाशिक भागातील रुग्णांच्या संपकातील आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com