Photo Gallery : वीर दाजीबा बाशिंग मिरवणूक! नाशकात धुलिवंदनाची अनोखी परंपरा
स्थानिक बातम्या

Photo Gallery : वीर दाजीबा बाशिंग मिरवणूक! नाशकात धुलिवंदनाची अनोखी परंपरा

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकच वेगळेपण जपणारा होळी सणाच्या दुस-या दिवशी शहरातून निघणारी वीरांची मिरवणूक विशेष ओळखली जाते. बाशिंगे वीरांना ‘दाजीबा वीर’ म्हणूनही ओळखलं जातं.

या निमित्ताने वीरांना पाहण्यासाठी शहरातील अनेकांनी पंचवटीतील राम कुंडावर गर्दी केली होती. जुने नाशिक परिसरातील दाजीबा वीर अर्थातच बाशिंगे वीर अशी या वीरांची ख्याती असून विविध देवांची वेशभूषा ते परिधान करतात.

जुन्या नाशिकमधून या मिरवणुकीला सुरुवात होऊन जूनी तांबट लेन, रविवार पेठ मार्गे गंगाघाटावरून परत जुन्या नाशिकमध्ये या मिरवणुकीचा शेवट होतो. दुपारी दोन वाजता निघालेली मिरवणूक दुसऱ्या दिवशी पहाटे पर्यंत सुरु असते. या पारंपारिक मिरवणुकीमुळे नाशिकमधील वातावरण भक्तिमय होऊन जातं. धार्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकने गेल्या 300 वर्षांपासून ही परंपरा जपली आहे.

(सर्व छायाचित्र : सतीश देवगिरे, देशदूत)

Deshdoot
www.deshdoot.com