आरटीईसाठी शुक्रवारी निघणार सोडत ?
स्थानिक बातम्या

आरटीईसाठी शुक्रवारी निघणार सोडत ?

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यानुसार या कायद्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये राखीव जागांवर प्रवेश देण्यासाठी शुक्रवारी (दि.13) राज्यस्तरावर सोडत काढली जाईल,असे सूत्रांनी सांगितलेे.

या कायद्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार यावर्षी 447 शाळांमध्ये एकूण 5,553 जागा राखीव असून,त्यासाठी ऑनलाइन एकूण 17,670 अर्ज प्राप्त झाले आहेत.म्हणजेच राखीव जागांच्या तुलनेत प्राप्त अर्जांची संख्या तिपटीने अधिक आहे.ऑनलाइन अर्जाचा टप्पा पार पडल्यानंतर आता पुढील टप्प्यात सोडत काढण्यात येणार आहे.

त्यासाठी 11 आणि 12 मार्च हे दोन दिवस ठरविण्यात आले होते.त्यानंतर सोडतीत समावेश झालेल्या बालकांना प्रत्यक्ष त्यांनी निवडलेल्या शाळांमध्ये जाऊन प्रवेश घेण्यास मुदत मिळणार होती.मात्र,संकेतस्थळावर सोडतीची तारीख कळविण्यात येईल, असा संदेश फिरत असल्याने बुधवारी काढण्यात येणारी सोडत रद्द झाली. यासंदर्भात सरकारी पातळीवरून कोणतेही लेखी पत्र प्राप्त झाले नसल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे म्हणणे आहे.

पालकवर्गामध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला असून गतवर्षी शाळा सुरू झाल्यानंतरही ही प्रक्रिया सुरूच होती.यावर्षीही पुन्हा मुदतवाढीचा फेरा सुरू होतो की काय, अशी शंका पालकांच्या मनात आहे. बुधवारी रद्द झालेली सोडत शुक्रवारी (दि.13) काढण्यात येणार असल्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली.

Deshdoot
www.deshdoot.com