किल्ले रामशेजवर अज्ञातांनी लावली आग; शिवकार्यकडून स्वच्छता मोहीम
स्थानिक बातम्या

किल्ले रामशेजवर अज्ञातांनी लावली आग; शिवकार्यकडून स्वच्छता मोहीम

Gokul Pawar

नाशिक : रामशेज किल्ल्यावर वणवा लावल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान नाशकातील शिवकार्य गडकोट संवर्धन माध्यमातून रामशेजवर जाऊन डागडुजी करीत माथ्यावर स्वच्छता करण्यात आली. तसेच वनधिकाऱ्याकडे तक्रार करीत संबधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी यावेळी संस्थेने केली आहे.

दरम्यान गत आठवड्यात अज्ञात माथेफिरूंकडून रामशेजच्या माथ्यावर वणवा लावल्यात आला. यामध्ये किल्ल्यावरील झाडे, तथा लाकडी अवशेष जळाल्याची माहिती शिवकार्य गडकोट संस्थेने दिली. यासंदर्भात किल्ल्याच्या असुरक्षेबाबत थेट वन अधिकाऱ्यांकडे संस्थेने तक्रार केली आहे.

घटनेची माहिती मिळल्यानंतर शिवकार्य गडकोट संस्थेने या ठिकाणी स्वच्छता करून किल्ल्याचे अस्ताव्यस्त पडलेले दगड जोत्यावर समपातळीत रचण्यात आले. तसेच किल्ल्याच्या माथ्यावरील रोपांना पाणी टाकण्यात आले. रामशेजवर झालेल्या नुकसानीबद्दल शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्यावतीने दिंडोरी वनविभागाचे अधिकारी व्ही.वाय.गायकवाड यांच्याकडे संबंधीत घटनेबद्दल तक्रार करण्यात आली.

किल्ल्यावरील जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची रजिस्टरवर नोंदणी व्हावी, त्यांच्याकडे ज्वालाग्रही वस्तू आढळल्यास त्यावर कार्यवाही व्हावी यासाठी पर्यटक नोंदणी कक्ष, तपासणी कक्ष उभारावा अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली.

Deshdoot
www.deshdoot.com