अनेक वर्षांनी ‘द्वारका चौका’ने घेतला सुटकेचा निश्वास
स्थानिक बातम्या

अनेक वर्षांनी ‘द्वारका चौका’ने घेतला सुटकेचा निश्वास

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक | प्रतिनिधी

शहरात प्रवेश करण्यासाठीचा प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या ‘द्वारका सर्कल’ने कधी नव्हे तो मोकळा श्वास सुरुवात केला आहे. अवजड वाहनांना सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत प्रवेश बंदी करत त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग खुला करून देण्यात आला आहे. सद्य स्थितीला ‘द्वारका चौक’वर फक्त दुचाकी, चारचाकी वाहने आणि एसटी बसेसला परवानगी देण्यात आली आहे.

नाशिक शहर वाहतूक शाखे कडून घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. या संदर्भात अधिक खबरदारी म्हणून शहरात प्रवेश करणाऱ्या ठिकाणी बँँरीकेट टाकून तेथे वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com