दिखावा करणार्‍या चमकोंचाच सत्कार; लॉकडाऊन काळातील खरे मदतगार अंधारातच

दिखावा करणार्‍या चमकोंचाच सत्कार; लॉकडाऊन काळातील खरे मदतगार अंधारातच

नाशिक : लॉकडाऊन काळात गोरगरीबांना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे आले. संस्थांनी दानशुरांकडून मदत मिळवून तीच्यामधून गरीब गरजुंना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला. काहींनी रोज अन्न तर अनेकांनी वस्तु रूपाने मदत केली. खर्‍या मदत करणारांनी याचा गवगवा केला नाही.

परंतु इतरांनी दुसर्‍यांच्या मदतीवर मोठ्या प्रमाणात फोटो आणि प्रसिद्ध मिळवली. याच्या परिणामी समाजातून खर्‍या दानशुरांना वगळून चमकोगिरी करणाऱ्या, खोटा आव आणणारांचाच सत्कार होत असल्याचे चित्र आहे. असाच प्रकार शहरातील एका पोलीस ठाण्यात झालेल्या सत्कार समारंभातही घडल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात तसेच महाराष्ट्र राज्यात संपूर्ण लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे सर्व प्रकारचे काम धंदे बंद झाले, अशा वेळी गोरगरीब तसेच गरजू लोकांच्या मदतीसाठी हजारो लोक धावून आले. यामध्ये काही लोकांनी स्वखर्चाने गरजूंची मदत केली तर काही लोक व संस्थांनी इतरांकडून मदत घेऊन गरजू लोकांपर्यंत ती पोहोचविली. मदत करणार्‍या पैकी साधारण ९० टक्के लोकांनी कोणतीही अपेक्षा न करता प्रामाणिक पणे मदत केली. त्यांनी ना फोटो काढले ना आपले फोटो कोणत्याही प्रकारे सोशल मीडियावर टाकले नाही, त्यांनी हे पुण्याचे काम समजून लोकांना मदत पोहोचवली.

मात्र उर्वरीत दहा टक्के लोकांनी इतर संस्थां तसेच मदतगारांच्या गोरगरीब तसेच गरजू लोकांना मदत केल्याचा दिखावा करणारे फोटो इतरत्र तसेच सोशल मीडियावर टाकले होते. यामुळे अशा लोकांची छवी सगळीकडे सामाजिक कार्यकर्ता म्हणून निर्माण झाली. तर खरे मदत करणारे दूर राहिले.

तीन दिवसांपूर्वी एका पोलीस ठाण्यात लॉक डाऊन काळात गरजूंना विविध प्रकारे मदत करणार्‍या काही संस्था तसेच व्यक्तींचा सत्कार पोलीसांनी आयोजित केला होता. यावेळी पोलिस वरिष्ठ अधिकारी स्वतः उपस्थित होते.

सामाजिक काम करणार्‍या संस्थांच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात प्रसंगी पोलीस मित्र म्हणून मागील काही काळापासून काम करणार्‍या सेवकांचा देखील या वेळी सत्कार करण्यात आला. परंतु खरे काम करणारे सोडून चमकोगिरी करणारे, तसेच सोशल मिडियावर मिरवणारांचाचा यात अधिक भरणा असल्याचे चित्र होते.

यामुळे खरी मदत करणार्‍यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. यामुळे हा विषय चर्चेत आला आहे. गरजुंना केली म्हणून खरे तर कोणाचे सत्कार करू नयेत आणि केले तर खरी मदत करणारांना शोधून त्यांचा सत्कार व्हावा अशी अपेक्षा पुढे येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com