हुश्श! करोना व्हायरसबाबत ‘त्या’ रुग्णाची चाचणी निगेटिव्ह
स्थानिक बातम्या

हुश्श! करोना व्हायरसबाबत ‘त्या’ रुग्णाची चाचणी निगेटिव्ह

Gokul Pawar

नाशिक : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या एका प्रवाशाचे कोरोनासाठीचा प्रयोगशाळा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे सर्वानी सुटेकचा निस्वास सोडला आहे.

दरम्यान इटली देशातून कोरोनाचा संशयित रुग्ण नाशिक येथे लआला होता. या संशयित रुग्णास जिल्हा रुग्णालयातील कोरोना विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संबंधीतास सर्दी झाल्याने त्यांना खबरदारी म्हणून दाखल करण्यात आल्यानंतर आज वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. यामध्ये तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून राज्यात सध्या सात जण निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com