परिवर्तनाची चळवळ ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’; नाशकात शुक्रवारपासून नाट्यमहोत्सव
स्थानिक बातम्या

परिवर्तनाची चळवळ ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’; नाशकात शुक्रवारपासून नाट्यमहोत्सव

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : थिएटर ऑफ रेलेवन्सतर्फे नाशिकरांसाठी तीन दिवशीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार ( दि. २१) पासून येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात हा नाट्यमहोत्सव पार पडणार आहे.

हा तीन दिवसीय नाट्यमहोत्सव २३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, यातील प्रयोग रोज सायंकाळी ६. ३० वाजता होतील. जीवन प्रवासावर भाष्य करणारे गर्भ या नाटकाचे सादरीकरण शुक्रवारी (दि. २३), तर शनिवारी राजगती आणि रविवारी (दि.२३) ‘न्याय के भंवर में भंवरी’ या नाटकांचे सादरीकरण होणार आहे. या नाट्यकृती अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सुरेखा साळुंखे, बेट्सी अॅन्ड्रूज, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, सचिन गाडेकर, प्रियांका कांबळे आणि बबली रावत साकारणार आहेत. तर रंगचितक मंजुल भारद्वाज यांनी लेखन व दिग्दर्शन केले आहे.

“गर्भ”
गर्भ हि आपल्या जीवन प्रवासावर भाष्य करते. जसे आपण माणूस म्हणून आईच्या गर्भातून जन्माला येतो. परंतु मोठे होताना आपल्या भोवती भाषा, जात, धर्म, प्रांत यांचे आवरण तयार करते जे आपल्याला मारताना माणूस म्हणून आपली ओळख नाही देत. शेवटी गर्भ नाटकातून लेखक सांगतो कि जीवन सुंदर आहे.

“राजगती”
राजगती नाटक हे राजकारणावर भाष्य करते. सामान्य माणसाची राजकारण खराब ही भावना असते. राजगती नाटकातून लेखक मांडतात कि राजकारण शुद्ध, सात्विक आणि पवित्र आहे. देवानंतर आज फक्त राजनीती म्हणजे राजकारण हेच मानव कल्याण करणारी नीती आहे. खराब असते ते राजनैतिक व्यक्ती चे चरित्र आणि राजगती नाटक राजनीतिक व्यक्ती चरित्र, व्यवस्था व सत्ता यावर भाष्य करते आणि जनतेला राजनीतिक सह्भागीतेसाठी प्रतिबद्ध करते.

“न्याय के भवर में भवारी”
पितृसत्ताक समाजात समानता व न्यायसंगत समाजाची मांडणी लेखक या नाटकाच्या माध्यमातून करतात. आज पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्री सोबत पुरुष ही तेवढाच भरडला जात आहे. शरीरापलीकडे जाऊन माणूस म्हणून जगण्याची दिशा हे नाटक दाखवते.

Deshdoot
www.deshdoot.com