राष्ट्रीय मतदारदिन : निर्यभयपणे मतदान हेच लोकशाहीचे बलस्थान
स्थानिक बातम्या

राष्ट्रीय मतदारदिन : निर्यभयपणे मतदान हेच लोकशाहीचे बलस्थान

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : बलशाली लोकशाहीसाठी निवडणूक सारक्षरता या विषयावर आधारित यंदा मतदार नोंदणी आणि जागृती करण्यात आली. निर्भयपणे मतदान प्रक्रियेअंतर्गतच बलशाली लोकशाहीची निर्मिती करता येईल. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली येऊन मतदान न करता निर्भयपणे मतदान करण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी. यासाठी राष्ट्रीय मतदारदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वच अधिकार्‍यांनी बळकट लोकशाहीसाठीची शपथ घेतली.

25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शुक्रवारी ( दि. 24) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व उपस्थित सेवक अधिकार्‍यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली.

या निमित्ताने लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याचा उपक्रम साजरा करण्याचे आदेश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले होते. त्याअंतर्गत बलशाही लोकशाहीकरिता निवडणूक साक्षरता हा विषय 2020 या वर्षाकरिता निवडण्यात आला असून जास्तीत जास्त मतदारांचा लोकशाही बळकटीकरण यामध्ये समावेश असावा.

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदन सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांच्यासह अधिकारी, सेवक उपस्थित होते. प्रास्ताविक तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले.

विविध उपक्रमांद्वारे साजरा
नव मतदारांना ‘मतदार असल्याचा अभिमान आणि मतदानासाठी सज्ज’ असे घोषवाक्य लिहिलेले बिल्ल्यांचे वाटप करण्यात आले. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करत प्रोत्साहन दिले जाणार आहे. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, परिसंवाद अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यातील उत्कृष्ट पहिल्या तीन विजेत्यांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र देत सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय दिव्यांग मतदार, नव मतदारांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com