Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमविप्रचे डाॅ.पवार रुग्णालय ११ जूनपासून पूर्ववत सुरु

मविप्रचे डाॅ.पवार रुग्णालय ११ जूनपासून पूर्ववत सुरु

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड रुग्णालय म्हणून घोषित केलेले मविप्र संचलित डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय हे गुरुवार (दि.११ ) पासून पूर्ववत सुरु होणार असून पुर्वीप्रमाणे रुग्णांवर उपचार केले जाणार आहे.

रुग्णालय सुरु करुन रुग्णांवर उपचार करता यावे यासाठी कोव्हिड रुग्णालयाची इमारत नर्सिंग काॅलेजमध्ये शिफ्ट करण्यात आली अाहे. या ठिकाणी १२० करोना पाॅझिटिव्ह पोलिसांवर उपचार करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मागील एक महिन्यात १३० करोना पाॅझिटिव्ह पोलिसांवर उपचार करण्यात आले असून ते ठणठणीत होऊन घरी परतले आहे.

- Advertisement -

गुरुवारपासून रुग्णालयातील सर्व तपासण्या तसेच ऑपरेशन नेहमीप्रमाणे केले जातील. रुग्णालयातील सर्जरी, अॉर्थो ,गायनॅक, आय सी यु. एम आर आय , सिटी स्कॅन,सर्व प्रकाराच्या रक्त व लघवी तपासण्या, निकु, पिकू, डायलिसीस सुविधा व इतर विभाग पूर्ववत सुरु होणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

सर्वसामान्य रुग्णांनी तसेच संस्थेच्या सभासदांनी यांची नोंद घेऊन रुग्णालय सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या सरचिटणीस श् निलीमाताई पवार यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या