मुस्लिम आरक्षणामुळे मराठा आरक्षण धोक्यात : चंद्रकांत पाटिल

मुस्लिम आरक्षणामुळे मराठा आरक्षण धोक्यात : चंद्रकांत पाटिल

नाशिक । महाविकास आघाडी सरकार मुस्लिमांना देत असलेले पाच टक्के आरक्षण हे घटनाबाहय असून हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही, यामुळे मराठा व ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटिल यांनी केले आहे.

दरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी सरकारवर टीका केली. यावेळी ते म्हणाले कि, पाच टक्के आरक्षण देऊ असे सांगत सरकार मुस्लिमांची फसवणूक करत असल्याची टिका देखील त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले कि, महाविकास आघाडिने दिलेली कर्जमाफ़ी फसवी आहे. जे नियमित कर्ज भरतात त्यांना कोणताही दिलासा नाही. फडणवीस सरकारने दिलेल्या कर्जमाफीमुळेच २०१५ पासुन पुढिल कर्जमाफी हे सरकार देऊ शकले. सातबारा कोरा आश्वासनाचे काय झाले, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

AD
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com