इंदिरानगर : अनैतिक संबधावरून झालेल्या खुनातील संशयितास अटक
स्थानिक बातम्या

इंदिरानगर : अनैतिक संबधावरून झालेल्या खुनातील संशयितास अटक

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : पत्नीशी अनैतिक संबंधावरुन झालेल्या खुन प्रकरणी संशयितास इंदिरानगर गुन्हे शोध पथकाने दि. १० शुक्रवार रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास नगर येथून अटक करण्यात आली.

दरम्यान अधिक माहिती अशी कि, मागील महिन्यात पाथर्डी येथे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने प्रियकराचा खून केल्याची घटना या घटनेत नरपत सिंह गावीत (वय४० रा पाथर्डी गाव मुळ गाव नंदुरबार) याचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर संशयित विठ्ठल गव्हाणे फरार झाला होता.

पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चौफेर चक्रे फिरवत होते. अखेर क्षेत्र काठवन खंडोबा महाराज मंदिर नगर येथुन (दि. १०) पहाटे दीड वाजेच्या सुमारास त्यास अटक केली. सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पीटी पाटील, सपोनी राकेश भामरे दत्तात्रय पाळदे, संदीप लांडे, जावेद खान यांच्या पथकाने केली.

Deshdoot
www.deshdoot.com