घोटी येथील कृषी प्रदर्शनात वीस वर्षीय युवकाचा खुन; संशयितांना अटक
स्थानिक बातम्या

घोटी येथील कृषी प्रदर्शनात वीस वर्षीय युवकाचा खुन; संशयितांना अटक

Gokul Pawar

Gokul Pawar

जाकीरशेख । घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे प्रदर्शनाच्या प्रांगनात रहाट पाळन्याच्या ठिकाणी २० वर्षीय युवकाचा प्राणघातक हल्ल्यात खून झाला. चार दिवसांपूर्वी घोटी महामार्गावरील एका होटेलात जेवन करीत असताना रागाने पाहिल्याचा कारणातुन वाद झाला होता. त्या वादाचा बदला घेण्यासाठी माणिकखांब येथील सात ते आठ युवकांनी देवळे येथील युवकावर हल्ला करीत हत्याराने वार केले त्यात देवळे येथील युवकाचा मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली.

दरम्यान घोटी पोलिसांनी या घटनाप्रकरणातील सात संशयित युवकांना चार तासात जेरबंद केले. या संशयितांना अटक करून इगतपुरी न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली. यातील एका फरारी संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की पाच दिवसांपूर्वी घोटी महामार्गावारील हॉटेल नटराज येथे मयत विनोद मछिन्द्र तोकडे व संशयित आरोपी सागर गोविंद चव्हाण यांच्यात वाद झाला होता. काल दि १५ रोजी रात्रि साडेनउ वाजेच्या सुमारास घोटी येथील कृषि व जनावरांच्या प्रदर्शन स्थळी असलेल्या गर्दीत सागर चव्हाण व अन्य आठ युवकांनी विनोद मछिन्द्र तोकडे (वय २०) रा देवळे यास मागील भांडनाचे कारणावरुन लाकडी दांडाने बेदम मारहाण करून पोटात चाकू हल्ला केल्याने तो गतप्राण झाला यावेळी घोटी पोलिस सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे व पोलिस पथकाने तात्काळ धाव घेऊन संशयित आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात असताना त्यातील दोघांना तात्काळ पकडन्यात आहे.

पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत चार तासात एकूण सात संशयित युवकांना ताब्यात घेयून अटक करण्यात आली.या खून प्रकरणाने इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

घोटी पोलिसांनी या प्रकरणी सागर गोविंद चव्हाण ( वय २० ) रवींद्र बाळू चव्हाण ( वय १९ ) रामदास उर्फ राम बाळू चव्हाण ( वय १९ ) अनिकेत अंबादास चव्हाण ( वय २० ) जगन राज चव्हाण ( १९ ) अमोल रामदास चव्हाण ( वय २० ),अजय रमेश चव्हाण यांना अटक करण्यात आली असून तर आकाश ज्ञानदेव चव्हाण वय २० हा फरार आहे. हे सर्व संशयित युवक माणिकखांब ता इगतपुरी येथील रहिवासी आहेत. संशयित सर्व युवक १९/२० वर्ष वयोगटाचे आहेत

दरम्यान मयताचा चुलत भाऊ दीपक शंकर तोकडे याने दिलेल्या फिर्यादिवरुन घोटी पोलिसांनी या सर्व संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलिस प्रमुख डॉ आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी, आनंदा माळी, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल धुमसे, हवालदार बिपिन जगताप, विश्वास पाटील,अशोक कोरडे, भास्कर शेळके, शितल गायकवाड, संतोष दोंदे, भास्कर महाले, लहू सानप, रमेश चव्हाण, प्रकाश कासार, शरद कोठुळे, रामकृष्ण लहामटे आदिनी जलदगतिने संशयित आरोपींची धरपकड़ केली. घोटी पोलिस पुढील तपास करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com