Friday, April 26, 2024
Homeनाशिकमहापालिकेला एक हजार पीपीई किट प्राप्त; शिल्लक किट काही दिवसात मिळणार

महापालिकेला एक हजार पीपीई किट प्राप्त; शिल्लक किट काही दिवसात मिळणार

नाशिक : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांनाच आता करोना रुग्णांवर उपचार करण्याचे मोठे आव्हान आरोगय सेवा विभागाच्या यंत्रणेसमोर उभे राहिलेले होते. या उपचारासाठी लागणार्‍या पीपीई किटचा अभावामुळे उपचारावर निर्बंध आले होते.

आता शासनाकडुन हे किट उपलब्ध करुन देण्यात येत असुन महापालिकेने उत्पादक कंपनीकडे केलेल्या मागणी केल्यानुसार २००० किटपैकी १००० किट आता उपलब्ध झाले आहे. यामुळे करोना संशयित व पाझिटीव्ह रुग्णावर सुरक्षित उपचार करणे सोपे होणार आहे.

- Advertisement -

राज्यात करोनाचा आकडा वाढत असतांनाच नाशिक जिल्ह्यात पहिल्या दोन आठवड्यात एकही रुग्ण पाझिटीव्ह सापडला नव्हता. तरीही नाशिक जिल्हा रुग्णालय व महापालिका रुग्णालयात येणार्‍या संशयित करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारे पीपीई किट नसल्याने वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्‍यांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील आयएमए आणि फिजीशियन असोसिएशनच्या डॉक्टरांकडुन उपचारासाठी हातभार लावला जात असतांना या डॉक्टरांनी पीपीई कीटची मागणी केली होती. या एकुणच पार्श्वभूमीवर महापालिकेकडुन आयुक्तांच्या अधिकारात दोन हजार किटची मागणी नोंदविण्यात आली होती. हे किट तातडीने उपलब्ध करुन देण्यास सांगण्यात आले होते.

यानुसार नुकतेच महापालिका वैद्यकिय विभागाला एक हजार किट प्राप्त झाले आहे. यात संपुर्ण सुट, गॉगल, मास्क यासह इतर वस्तुंचा एका ककिट मध्ये समावेश असतो. तसेच पुढच्या काही दिवसातच उर्वरित एक हजार किट मिळणार आहे. सध्या प्राप्त किटनुसार महापालिकेकडुन करोना संशयितांवर उपचार सुरू झाले आहे.

महापालिकेसाठी हे पीपीई किट उपलब्ध होण्यापुर्वी नाशिक आयएमएकडुन डोनेशनच्या माध्यमातून वीस पीपीई किट खरेदी करण्यात येऊन महापालिका रुग्णालयात उपचार करणार्‍या ११ वैद्यकिय अधिकारी, नऊ सिस्टर यांना देण्यात आले होते.

तसेच पाच गुडघ्यापर्यत असलेले शुज, ब्ल्यु रंगाचे मास्क व हॅण्डग्लोज उपलब्ध करुन देण्यात आले होते. या कामात डॉ. समीर चंद्रात्रे व डॉ. देवरे यांनी पुढाकार घेतला होता. याच पीपीई किटच्या माध्यमातून अगोदर संशयितांवर उपचार सुरू झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या